ताज्या बातम्या

Shiv Sena Factions Clash ; शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये तुफान राडा, मातोश्री क्लबमधून दगडफेक!

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये तणाव निर्माण, मातोश्री क्लबमध्ये दगडफेक. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मोठा राडा.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारावर मतदारांना पैसे वाटप करण्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला.

  2. आरोपांमुळे वातावरण अधिकच तापले असून, दोन्ही गटांमध्ये संघर्षाच्या चिन्हांचा सामना केला जात आहे.

  3. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये मातोश्री क्लबमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये मोठा राडा असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप शिंदे गटाच्या उमेदवारावर केला आहे. या आरोपांमुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून, वातावरण अधिकच तापले आहे. परिणामी, मातोश्री क्लबमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला.

जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिंदे गटाचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत होते, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या आरोपाची माहिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी क्लबमध्ये जाऊन पैसे वाटप थांबविण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटप रोखण्यासाठी मातोश्री क्लबमध्ये पोहोचताच शिंदे गटाच्या समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत ठाकरे गटाचे उमेदवार बाळा यांना देखील मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवाय, ड्रायडे असतानाही मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट अँड बारमध्ये सुमारे ३५० जणांचा जमाव असल्याचा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

या सगळ्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद