ताज्या बातम्या

'जय भीम म्हटलं म्हणून मंत्रीपद दिलं नाही' चित्रा वाघ यांनी नितीन राऊतांचा 'तो' व्हिडीओ केला शेअर

चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात जय भीम म्हटल्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही असं राऊत म्हणाले आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्रातील 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नितीन राऊत असे म्हणताना दिसत आहेत की, "जय भीम" म्हणाल्यामुळे विलासराव देशमुख यांनी त्यांना मंत्रीपद न दिले. सध्या या व्हिडीओमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी राहिलेली आहे. एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात, की केवळ 'जय भीम' म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो, नितीन राऊतजी यात नवीन काय आहे ? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती...अशी टीका चित्रा वाघ यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

व्हिडीओमध्ये काय म्हणाले नितीन राऊत?

शपथविधीपूर्वी मला फोन करून तुमचे नाव मंत्रिमंडळात आहे, तयारीला लागा, असे सांगण्यात आले, मात्र शपथविधी होणार असतानाच तुमचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मी तीन महिने मंत्रालयात गेलो नाही.

"अखेर अनेक महिन्यांनी ज्या भागात मतदारांनी मला निवडून दिले आहे, त्या भागातील कामे मार्गी लावण्यासाठी मी मंत्रालय गाठले. तेथे मला मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना भेटावे लागले. मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. मंत्री महोदय, मी सहाव्या महिन्यात मंत्रिमंडळाची बैठक चालू होती, त्यावेळी एकनाथराव राज्यमंत्री होते आणि त्यांनी माझा हात धरला आणि सांगितले की, नितीनभाऊ विलासरावांना भेटणार आहेत. "मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे."

नितीन राऊत पुढे म्हणाले की, "मी म्हणालो सांगा - त्यानंतर ते इथे नाही म्हणाले आणि मला कोपऱ्यात घेऊन गेले आणि मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुख मोठ्याने जय भीम म्हणता, हे जय भीम म्हणणे बंद करा कारण त्यांच्यामुळे तुमचे मंत्रीपद गेले. त्यावर मी म्हणालो, जय भीम म्हटल्याने मला मंत्रिपद गमवावे लागले यापेक्षा मोठा अभिमान कोणता असेल ते सांगा. नितीन राऊत उत्तर नागपुरातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे राजकीय पेच अधिकच वाढला आहे.

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स

महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 288 मतदारसंघ, जवळपास 4500 मतमोजणी पथके मतमोजणीसाठी सज्ज

Jalgaon | Gulabrao Patil यांच्या विजयासाठी साकडं; पशुपतीनाथ महादेव मंदिरात अभिषेक