ताज्या बातम्या

साकीनाका प्रकरणातील आरोपीला फाशी; चित्रा वाघ म्हणाल्या, घरी बसा पण...

Saki Naka Rape Case : चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Published by : Sudhir Kakde

राज्याला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape Case) प्रकरणातील दोषीला सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. या घटनेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता. नराधमाने पीडितेचा बलात्कार करुन तिचा निघृणपणे खून केला होता. या प्रकरणातील दोषीला मिळालेल्या शिक्षेनंतर अनेकांनी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही याबद्दल आपल्य़ा भावना व्यक्त केल्या आहेत.

चित्र वाघ या प्रकरणावर म्हणाल्या की, "साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता राज्यसरकारने उच्च न्यायालयात या शिक्षेवर लवकरात लवकर शिक्कामोर्तब होईल व त्या शिक्षेची अंमलबजावणी होईल असा प्रयत्न करावा तरच पीडितेला न्याय मिळेल व अशा अपराधाला पायबंद बसेल. घरी बसा पण एव्हढं जमवाचं" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका