औरंगाबाद : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात एका तरुणीने अत्याचार केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता या तरुणीने घुमजाव केला असून, चित्रा वाघ यांच्याविरोधातच तक्रार केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणात आता औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुचिक यांच्या प्रकरणात देखील चित्रा वाघ यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चित्रा वाघ यांनी मात्र या विषयावर बोलताना सांगितलं की, आमच्याकडे अशा मुली येतात आणि त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक काम करताना अशा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा तक्रारींमुळे चित्रा वाघ घाबरणार नाही. मला चौकशीसाठी बोलावलं तर मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहोत असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.