ताज्या बातम्या

विरोधकांवर टीका, मधुरिमाराजे यांच्याबद्दल खंत चित्रा वाघ काय म्हणाल्या पाहा...

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोलापूरमध्ये मधुरिमाराजे यांच्या संदर्भात खंत व्यक्त केली. वाघ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आणि महिलांच्या मेळाव्यात महाभकास आघाडीच्या नेत्यांवर संताप व्यक्त केला.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत सोलापूर दक्षिण मधील भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

  2. दक्षिण सोलापुरातील जुळे सोलापूर परिसरामध्ये महिलांचा मेळावा आयोजित केला गेला.

  3. भाजपाच्या नेत्यांनी मधुरिमाराजे यांच्या संदर्भात झालेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.

भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत सोलापूर दक्षिण मधील भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिण सोलापुरातील जुळे सोलापूर परिसरामध्ये महिलांच्या मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आला होतं. यादरम्यान भाजपाच्या नेते आमदार चित्रा वाघ यांनी मधुरिमाराजे यांच्या बद्दल झालेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

त्या कुणी साध्यासुध्या नाही आहेत छत्रपतींच्या सुनबाई आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं छत्रपतींच्या सुनबाईसोबत कशाप्रकारे वागण्यात आला. त्यांचा नवरा त्याने तिचा असा हात असा खेचून त्यांना पुढे घेतलं त्यांचे सासरे जे खासदार आहेत छत्रपती आहेत त्यांनी सांगितले यांच्यासमोर सही करा ज्या दर्डवणीच्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलले तर सगळ्यांनी ऐकलं. मधुरीमाराजे त्यांच्या चेहऱ्यावरती जी अगतिकता दिसत होती ती डोळ्यात पाणी आणणारी होती.

मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेता सतेज पाटील बंटी पाटील या बंटी पाटलांनी गादीचा मान असं म्हणत कॅम्पिंग केलं मग कोणाला छत्रपतींच्या गादीला आणि त्याच परिवारातल्या सुनबाईंना दम नव्हता तर उभारलात कसे अशा पद्धतीची जी भाषा वापरली ती योग्य नाही. तुमच्या सोबत कोणी काय केलं तुमची कोणी घंटी वाजवली ते बंटी भाऊंनी शोधावं.

ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली गेली त्यांच्याशी वागलं गेलं. राजकीय कार्यकर्ता म्हणून सोडून द्या पण एक बाई म्हणून मला अतिशय वेदनादायी वाटलं त्यांच्या चेहऱ्याची अगदिकता बघवत नव्हती त्या कुठल्या मनस्थितीत असतील तर त्यांना आणि परमेश्वरालाच माहिती परमेश्वराने त्यांना बळ द्यावं अशी मी प्रार्थना सुद्धा करते.

अतिशय संतापजनक असे उद्गार महाभकास आघाडीच्या या नेत्यांकडून केले जातात. मातृ शक्तीचा किती अपमान करता येईल त्या पद्धतीने अपमान करण्याची स्पर्धा लागली. आपण बघितलं की मुंबादेवीच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना उद्भव बाळासाहेब ठाकरे या गटाचे खासदार अरविंद सावंत आणि दुसरे सकाळी उठल्यावर जे गटार चालू होतं त्या संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनेची उमेदवार सुवर्णा करंजे ताई यांना म्हणलं की बकरी आहे आणि माझ्या गळ्यात बांधली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result