ताज्या बातम्या

फडणवीसांवरील टीकेवरुन देशमुखांना चित्रा वाघ यांनी सुनावलं

अनिल देशमुख यांच्या 'डायरी ऑफ अ होम मिनिस्टर' पुस्तकातील देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टरबूज्या उल्लेखावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कडाडून टीका केली आहे.

Published by : shweta walge

काही आठवड्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या 'डायरी ऑफ अ होम मिनिस्टर' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील टरबूज्या म्हणून उल्लेख करण्यात आलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या त्यांच्या पुस्तकातले दोन उतारे त्यांनी पोस्ट केले ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील टरबूज्या म्हणून उल्लेख होता. यावरुनच भाजपा, महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांचा उंदीर असा उल्लेख करत पलटवार आहे.

ट्विट करत म्हणाल्या की, खोटे बोलताना थोडा तरी ‘रिसर्च’ करावा. बिळं पोखरण्याची सवय लागलेला उंदीर त्यात कशाला वेळ घालवणार? नोव्हेंबर 2021 मध्ये अटक झाली तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्यानंतर 7 महिने त्यांचेच सरकार होते. तरी असे अनुभव या मूषक महाशयांना आले असतील, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. आणि तसेही जेवण कोणते द्यायचे हे न्यायालय ठरवीत असते. कारण कारागृहातील कैदी हा न्यायालयीन कोठडीत असतो. हे तर थेट न्यायालयावरच आरोप करायला निघाले, अशी टीका त्यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांची पोस्ट

अनिल देशमुख यांची ट्विटर पोस्ट

या पुस्तकातील एक उतारा ट्विट करत अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला. ट्विट करत म्हणाले, माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result