ताज्या बातम्या

Chiplun Flood : चिपळूणच्या महापुराला एक वर्ष पूर्ण; आठवणी आजही मनात ताज्या

चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरात होत्याचे नव्हते झाले होते. अनेक लोकवस्तीला फटकाही बसला. वाशिष्ठी व शिवनदी काठावरील नागरिकांना गाळ व अन्य समस्यांना सामोरे जावे लागले होते.

Published by : Siddhi Naringrekar

चिपळूण (Chiplun) शहर व परिसरात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरात होत्याचे नव्हते झाले होते. अनेक लोकवस्तीला फटकाही बसला. वाशिष्ठी व शिवनदी काठावरील नागरिकांना गाळ व अन्य समस्यांना सामोरे जावे लागले होते. या दिवशीं म्हणजेच गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे या दोन्ही शहरांना महापुराचा फटका बसला आणि क्षणांतच सारं उध्वस्त झाल होतं. त्यानंतर या दोन्ही शहरात आज एका वर्षांत काय बदल झाला आहे आणि यंदाचा पावसाळा कसा आहे? या घटनेला आता जवळजवळ वर्ष होत आले असले तरी या प्रसंगातून अजूनही अनेक कुटुंबे सावरलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागल्याने नदीकाठावरील नागरिकांसह शहरातील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या महापुरात मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai - Goa Highway) वाशिष्टी नदीचा पुल व परशुराम घाटाचा काही भाग खचल्याने महामार्गावरील वाहतूक आठवडाभर बंद करण्यात आली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी करून घाट पुन्हां सुरु करण्यात आला होता. या घटनेला आज वर्षे झाले. एक वर्षांत या घाटाचे काम अवघे 65 टक्केच पूर्ण झाले. तर चिपळूणचा एनरॉन पूल एका बाजूला खचला आहे. आजवर पुलाचे काहीच काम झालेले नाही.

महापूराची भिती अजूनही चिपळूणकरांच्या मनामध्ये आजही कायम आहे.चिपळूणकरांनी एकच मागणी शहरातून वाहणाऱ्या दोन नद्यांच्या पात्रातील गाळ उपसा व्हावा. यासाठी चिपळूणवासियांनी वेगवेगळी आंदोलनले, उपोषणेही केली. या गाळ उपशाच्या मागणीनंतर नाम फाउंडेशनने पुढाकार घेउन शिव नदीचा गाळ आणि प्रशासनामार्फत वाशिष्टीचा गाळ उपसा करण्यात आला.शहरात गतवर्षीच्या महापूरातून हळूहळू सावरतय. मात्र या घटनेच्या आठवणी कायमस्वरूपी मनात राहणार आहेत.

यंदा पावसात यंदा पुराचा कोणताही धोका जाणवला नाही.या गाळ उपशाच्या मागणीनंतर नाम फाउंडेशनने पुढाकार घेउन शिव नदीचा गाळ आणि प्रशासनामार्फत वाशिष्टीचा गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या पावसात वशिष्टीच पात्र भरले पण पाणी पात्राबाहेर आले नाही.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result