ताज्या बातम्या

Chintamani First Look 2023: चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा फर्स्ट लूक आला समोर; पाहा फोटो

तरूणाईचं खास आकर्षण असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

तरूणाईचं खास आकर्षण असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता या गणपतीचा आगमन सोहळा आहे. अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होत असतो. यंदा चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाचं 104वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणेच मंडळाकडून या आगमन सोहळ्यासाठी जय्यद तयारी करण्यात आली आहे. या आगमन सोहळ्याला पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला जातो.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. बाप्पाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इन्टाग्राम पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटो शेअर करुन त्यांनी अयोध्या जिनका धाम है राम जिनका नाम हैं मर्यादा पुरषोतम वो राम हैं, उनके चरणों में हमारा प्रणाम है…. असे लिहिलं आहे.

चिंतामणीचा हा आगमन सोहळा भाविकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे. “Chinchpoklicha Chintamani” च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आणि त्यांच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल