संजय देसाई, सांगली
सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावांच्या पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. लवकरच ही समिती जतच्या दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधणार असून जत तालुक्याला पाण्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावू,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुष्काळग्रस्त शिष्टमंडळाला दिल्याची माहिती तुकाराम महाराज यांनी दिली आहे.
रात्री उशिरा दीड वाजता शिष्टमंडळाची आणि मुख्यमंत्र्यांची भेट मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली आहे.जतचा पाणी प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं म्हणून सांगलीच्या कृष्णा नदीतून पाण्याचा कलश घेऊन तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी शिष्टमंडळ मंगळवारी सांगलीतून रवाना झाले होते.या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन जत तालुक्याच्या 42 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवू,असा आश्वासन दिलेल आहे,
त्याचबरोबर कर्नाटकमध्ये जाण्याबाबत आग्रही झालेल्या दुष्काळग्रस्त जनतेशी तातडीने संवाद साधण्याच्या बाबतीत सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना जत तालुक्याचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत,सांगली मध्ये तुकाराम महाराज यांनी कृष्णेच्या नदी काठावर येऊन भेटी बाबत माहिती दिली आहे,तसेच जिल्हाधिकारी राजा दयानिधी हे दुष्काळी जनतेशी संवाद साधण्यासाठी उमदी या ठिकाणी पोहोचणार असल्याचेही तुकाराम महाराज यांनी केले आहे.