ताज्या बातम्या

'मन, मन में मोदी' राहुल गांधीसह उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेची टीका

Published by : shweta walge

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. यावरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिकिया देत 'घर घर मी मोदी असे म्हणत होते पण, या निवडणूक निकालामुळे मन, मन में मोदी असा निकाल या चार राज्याच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला' असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, मोदी यांचा करिष्मा संपला असे म्हणत होते. पण, निकाल जनतेच्या हातात असतात. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारत तोडो असा प्रचार केला. त्यांना जनतेने धडा शिकविला. अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले की, बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना, अशी टीका करत होते. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. घरात बसणाऱ्याना लोक नाकारतात, मत देत नाहीत. घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवतात. जनतेमध्ये जाऊन काम करतात त्यांना समर्थन मिळते. काम करणाऱ्यांना लोक मत देतात. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला लोक नाकारतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम