राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरींचं कोडकौतुक केलंय. शरद पवार यांना आतापर्यंत 9 मानद पदव्या मिळाल्या आहेत. तर औरंगाबाद विद्यापीठात तिसऱ्यांदा हा सन्मान मिळतोय. देशातील रस्ते विकासात नितीन गडकरी तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद पवार यांचा गौरव आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केला गेला.
या दोन्ही नेत्यांना डी.लिट. पदवी प्रदान करताना या दोघांचा आजच्या पिढीचे आयकॉन या शब्दांत गौरव केलाय. डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या 62व्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमाच्यावेळी राज्यपाल यांनी एक वक्तव्य केलं आहे. राज्यपाल म्हणाले की, शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श तर आजच्या काळातले शरद पवार आणि नितीन गडकरी हे आदर्श आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याने नव्या वादाला आता फोडणी मिळाली आहे.