मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा तिसरा मेळावा पुण्यातील इंदापूरमध्ये पार पडला आहे. या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. . मनोज जरांगे यांना कायदा नाही का? त्यांच्यावर पोलीस देखील कारवाई करत नाहीत, असे भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे कधीही सभा घेतात मात्र आपल्याला वेळ दिला आहे.
मी काही बोललो की काही विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात जातीत तेढ निर्माण केली जात आहे. जरांगे रात्री 12, 1 दोन पर्यंत सभा घेतात. त्यांना कायदा आहे की नाही असा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला केला. आपण बोललो की लगेच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरुय. ते रोज बोलतात पण आम्ही 15 दिवसात बोलतोय. सौ सोनार की एक लोहार की असा इशारा त्यांनी जरांगे पाटील यांना दिला.
राज्यात अशांतता कोण माजवत आहे. तुला 24 नंतर दाखवतो हे काय चाललं आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. तुम्ही जर दादागिरी करणार असाल तर तुमच्या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, अस इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
राज्यात काही सुजाण मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा समाजाचे काही मोठे नेते आहेत. पण, त्यांना बोलायला कसली भती वाटते? मतांची, मग आमच्याकडे मते नाहीत. ८० टक्के मते आमची आहेत. कोण कुणबी सर्टिफिकेट घेणार आहेत? हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, काकडे यांना विचारा कुणबी सर्टिफिकेटपाहिजे का? कोणीही बोलायला तयार नाहीत. कारण निवडणूक आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले.
अति मागास करून त्यांना सेफ ठवले आहे. आताही 27 टक्के आरक्षण आहे. पण नोकऱ्या 9.5 टक्के आहे. आधी आमचे 27 टक्के आरक्षण पूर्ण भरा, अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली.
जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते तेथे पोलिसांनी सांगितले की चला. चला म्हणताच पोलिसांवर दगडफेक सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. विधानसभेत उपमुख्यमंत्री यांनी लेखी उत्तर दिले आहे असे भुजबळ यांनी सांगितले. एकूण 80 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही बाजू त्यावेळी पुढे आली असती तर त्याला सहानुभूती मिळाली नसती अशी टीकाही भुजबळ यांनी यावेळी केली