ताज्या बातम्या

कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या- भुजबळ

आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याच्या इगतपूरीमध्ये झालेल्या सभेत म्हणाले आहेत.

Published by : shweta walge

आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याच्या इगतपूरीमध्ये झालेल्या सभेत म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणच्या मुद्यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका आहे पण वेगळे आरक्षण द्यायला हवे ही माझी मागणी आहे. जबरदस्तीने कोणाला ओबीसीमध्ये घुसवले तर परत कोर्ट कचेऱ्या होणार. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. दबलेले पिचलेले आहेत जे मागास आहे त्यांना हे आरक्षण आहे. करोडो लोकांपैकी काही लोकांना हे आरक्षण आहे. याने गरिबी हटत नाही. काही लोकांना पुढे जाण्याची संधी मिळते पण काहीना मिळत नाही. पण मग याने सर्वांची गरिबी हटत नाही.

७५ वर्षांपासून दलितांना आरक्षण आहे. मोठ मोठे पदं त्यांनी भूषविले पण तरी दलीत वस्ती आहे मग त्यांची गरिबी हटली का?

५४ टक्के आदिवासी आहे त्यांना २७ टक्के आरक्षण द्या हे त्यावेळी झाले. मराठा समाजाला अनेक आयोग झाले. आता पावणे चारशे जाती झाल्या. काही लोक अडून बसले जाळपोळ झाली मग आम्ही कसे शांत बसणार. त्यांची लेकरे बाळे कशी तरी वाचली.

मीडिया समोर एक बाजू आली की पोलीस हल्ला करता आहे. पण त्या अगोदर काय झाले. प्रचंड दगडांचा मारा त्यावेळी झाला. महिला पोलिसांना मारले गेले. पोलिसांना मारले गेले म्हणून त्यांनी काठ्या चालवल्या.७० पोलीस जखमी झाले.त्यानंतर बीडमध्ये वाटेल त्याची घरे जाळली गेली आणि पोलिसांवर कारवाई झाली. आणि हे जे झाले ते समोर आले असते तर त्यांना सहनभुती मिळाली नसती.

महिला पोलिसांना विचारा नक्की काय झाले ते. मी खोटं बोललो असेल तर माफी मागेल. तुम्ही शांततेने मागा काय मागायचे आहे ते. मी कधीच मराठ्यांना विरोध केला नाही. ओबीसीमध्ये कुणबी सर्टिफिकेट आहे म्हणून तुम्ही निवडणूकीत आलात, चेअरमन झालात आणि तुम्ही आता मला विरोध करता. तुम्ही तुमच्यासाठी पुढे आला मग मी का ओबीसीसाठी पुढे येऊ नको.

कशासाठी हे सगळे चालले आहे. जाब त्यांना विचारा. कुणबी सर्टफिकेत देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. जे आहे त्यांना विरोध नाही. पेनाने लिहलेले सर्टिफिकेट आता देता आहेत. हा बॅक बोर्ड एंट्रीचा भाग आहे. तुम्ही वेगळे द्याना.

छगन भुजबळ यांच्या लेखी मंत्री पदापेक्षा ज्यासाठी लढला त्यासाठी लढेल. तुम्ही काही करायचे आणि आम्ही बोलायचे नाही? आम्ही मेंढरे आहोत का?

संभाजी राजे म्हणाले दोन जातीत वितुष्ट निर्माण करता आहे त्यांना मंत्रिपदावरून काढा. आमचे शाहू महाराज मागासवर्गीयांना पुढे घेऊन जाण्यासाठी लढत होते. त्या गाडीवर तुम्ही आहात तुम्ही एका समाजाची भूमिका घेऊन बोलता का? एकतर तुम्ही यात यायला नको होत. तुम्ही सांगायला हवे होत सगळ्यांचे आरक्षण शाबूत ठेवा. तुम्ही स्व:त बीड येथे जाऊन त्यांचे अश्रू पुसायल हवे होते हे पण तुमचे काम होत.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश