ताज्या बातम्या

Baba Siddique Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, हत्येची जबाबदारी…

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले.

Published by : shweta walge

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेनंतर सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरच मंत्री छगन भुजबळ प्रतिक्रिया देत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

माजी मंत्री बाब सिद्दीकी यांच्या हत्येमागे काय कारण असेल याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, " सिद्दिकी यांच्या हत्येमागे राजकारण आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार मला दिसून येत आहे. पोलिसांना सर्व काही कळतंय पोलिसांनी त्याचा बीमोड केला पाहिजे.

यावेळी कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना भुजबळांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखणे फक्त फक्त गृहमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. यासाठी पोलीस खात्यात योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजेत. योग्य अधिकारी कोण आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत असतं.

बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षा पासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षादेण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होतं. पोलीस काय करीत होते? असा प्रश्न भुजबळ उपस्थित केला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी