ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil यांच्या टीकेला छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, माझा जीव जाणार...

Published by : shweta walge

जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. यावरच आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाललं आहे हे त्यांनी सांगावं. असं ते म्हणाले आहेत. ते नाशकात माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीतील सभेतून छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला. मी अजितदादा पवार यांना आवाहन करतो की, छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या टीकेला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाललं आहे हे त्यांनी सांगावं. आता मनोज जरांगे पाटील कुणाचं खातोय हे त्यांनी सांगावं, असं छगन भुजबळ म्हणालेत.

शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.

Manoj Jarange on BJP ; मराठा समाज भाजपचं राजकीय एन्काऊंटर करणार, जरांगे पाटील यांचा इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजप मुंबईत भाकरी फिरवणार?

Vidhansabha Election 2024 : मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक! या तारखेपर्यंत करता येणार नाव नोंदणी

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Nikita Porwal: मिस इंडिया 2024 च्या स्पर्धेत उज्जैनची निकीता पोरवालने मारली बाजी, पाहा "हे" फोटो