Chhagan Bhujbal Speech: निवडणूक झाली की लाडकी बहीण योजना बंद होणार, असं विरोधक म्हणतात. पण ही योजना चालू ठेवण्याची धमक विरोधकांमध्ये नाही. त्यामूळे विरोधक सत्तेत आले तर योजना बंद होणार. लाडकी बहिण योजना आणि इतर योजना अविरतपणे सुरू राहण्यासाठी आपली सत्ता आली पाहिजे. युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार आहोत. शेतकऱ्यांनाही मदत करणार आहोत. शेतकऱ्यांना यापुढे वीजेचे बिल येणार नाही. त्यांना सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज मिळणार. तसच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थ यात्रा करण्यासाठी मदत केली जाईल, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं. ते माढा तालुक्यातील अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवासाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या विचारांबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले, 857 वर्षांपूर्वी संत सावतामाळी यांनी समाधी घेतली. त्यामूळे त्यांना संत शिरोमणी म्हंटले जाते. संत एकमेकांचे गुणगान करतात. श्रम आणि कष्टामध्ये देव आहे. देव माणसात आहे , जिथे जे काम करतो तिथे देव आहे. सर्व जाती धर्माचे संत होवून गेले. आम्ही कुठे जात नाही. आम्ही तुमच्या (महायुती) सोबत आहोत. भिडे वाडा स्मारकाचे 15 ऑगस्टपूर्वी भूमिपूजन व्हावं. भिडे वाडा स्मारकाच्या भूमिपूजनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पाहिजेत.
अरण या ठिकाणी सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा विचार दिला. या वारकरी संप्रदायात ज्यांनी पहिल्यांदा संजीवन समाधी घेतली आणि हे क्षेत्र पावन केलं. अशा या क्षेत्राच्या विकासासाठी आज या ठिकाणी भूमिपूजन झालं. मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवात आज झालीय. या ठिकाणी सावता महाराजांनी खऱ्या अर्थाने कर्मयोग सांगितला. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दांनी केलं. त्यांच्याजवळ असलेल्या परंपरेने समाजातील विविध लोकांना एकत्र आणून त्यांच्यात भक्तीभाव जागृत झाला पाहिजे. समाज एकसंघ राहिला पाहिजे, अशा प्रकारचा विचार ८०० वर्षापूर्वी ११ व्या शतकात त्यांनी ठेवला, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.