गोविंद साळुंके, शिर्डी
साई संस्थांच्या प्रसादालयातील मराठमोळ्या मेनूचा स्वाद थेट राष्ट्रपती भवनात पोहोचला असून या पदार्थाची रेसिपी जाणून घेण्यासाठी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना 15 दिवसांसाठी राष्ट्रपती भवनात निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या 7 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीचं साई संस्थांच्या प्रसादलयात भोजन केले होते. राष्ट्रपतींसाठी संस्थांच्या प्रसादालयातच भोजन बनवण्यात आले होते.
गावरान मेथी, बटाटा भाजी, डाळ भात, चपाती बटाटे वडापाव, बुंदीचा शिरा, तसेच विविध प्रकारच्या चटण्यांचा समावेश केला होता. साई संस्थान मध्ये राष्ट्रपतींसाठी जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांना 15 दिवसांसाठी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात बोलण्यात आले आहे. त्यानुसार साईबाबा संस्थाने राहाता तालुक्यातील नपावाडी येथील रवींद्र वाढणे व श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील प्रसाद कर्डिले या दोघांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.