1952 साली नामशेष झालेले चित्ते पुन्हा एकदा भारतात आले आहेत. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे त्यांचे नवीन निवासस्थान आहे. नामिबियातील आठ चित्ते विशेष मालवाहू विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. हे चित्ते आज सकाळी ग्वाल्हेरच्या महाराजा विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांना लष्कराच्या तीन विशेष हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. मात्र, आधी त्यांना काही दिवस विशेष बंदोबस्तात ठेवण्यात येणार आणि त्यानंतर त्यांना येथील हवा, पाणी आणि वातावरणाची सवय झाल्यावर जंगलात सोडण्यात येईल.
भारतात पुन्हा एकदा चितांचे आगमन झाल्याने केवळ पंतप्रधान मोदीच आनंदी नसून संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. #CheetahIsBack सोशल मीडियावरही टॉप ट्रेंडिंग आहे. यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण 'वेलकम बॅक' म्हणत आहेत, तर काही मीम्स शेअर करून आनंद व्यक्त करत आहेत.