ताज्या बातम्या

चांद्रयान मोहिम भारतासाठी का महत्वाची? जाणून घ्या...

भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान - 3 आज झेपावणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण होईल.

Published by : Team Lokshahi

भारताचे महत्त्वकांक्षी चांद्रयान - 3 आज झेपावणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण होईल. मोहिमेसाठी चांद्रयान - 2 च्या यशस्वी डिझाईन ऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला. या मोहिमेकडे देशवासीयांसह अवघ्या विश्वाचं लक्ष आहे.

भारताची चांद्रयान मोहीम- 1 आणि चांद्रयान मोहीम- 2 यशस्वी होऊ शकली नाही. या अपयशातून खचून न जाता भारतानं नव्या उमेदीन तयारी करून इस्रोनं चांद्रयान - 3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग करण्यावर भर दिला आहे. यासाठी आधी केलेल्या चूका टाळण्याकडं काटेकोरपणे लक्ष देण्यात आलं आहे.

शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राकडे झेपावेल. ते 24-25 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. पुढील 14 दिवस, रोव्हर लँडरभोवती 360 अंशात फिरेल आणि अनेक चाचण्या होतील. चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना रोव्हरच्या चाकांच्या खुणांची छायाचित्रे देखील लँडर पाठवेल.

चांद्रयान - 3 च्या उड्डाणासाठी इस्रोनं एलव्हीएम- 3 प्रक्षेपक विकसित केलं आहे. देशातील आतापर्यंतचे हे सर्वात अवजड आणि अद्ययावत प्रक्षेपक आहे. त्याचं वजन 640 टन आहे. सुरक्षित लॅण्डिंगसाठी इस्रोने 4 कि.मी x 2.5 कि.मी इतके क्षेत्र वाढविले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक लॅण्डिंग ठिकाण निश्चित केलंय. आहे, परंतु काही कारणास्तव ते शक्य न झाल्यास नजीकच्या योग्य ठिकाणी ते उतरवण्यात येईल. अतिरिक्त इंधनही उपलब्ध केल्यानं यशस्वी लॅण्डिंग होईल, असा विश्वास इस्रोनं व्यक्त केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result