जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली.
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जे काही निकाल येतील आम्हाला मजबूती देणारे निकाल असतील. मागच्यावेळेपेक्षा आम्हाला जास्तच यश मिळालं असेल. अनेक वर्षानंतर जी आमची त्याठिकाणी पक्ष मजबूत करण्याची भूमिका होती. मोठ्या प्रमाणावर त्याठिकाणी आम्हाला अनेक वर्ष जे यश मिळालं नाही ते यश यावेळी मिळेल. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.