ताज्या बातम्या

राहुल गांधींच्या सभेवरुन बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल; बाळासाहेबांचा तो व्हिडीओ केला शेअर

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची दादरच्या चैत्यभूमीवर सांगता होणार आहे. यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग या माध्यमातून फुंकण्यात येईल.

Published by : shweta walge

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची दादरच्या चैत्यभूमीवर सांगता होणार आहे. यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग या माध्यमातून फुंकण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर (Twitter) बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक सवाल विचारला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय?

शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता.

याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली.

‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे.

आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे.

वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच!

दरम्यान, आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित आहेत.

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी