Team L;okshahi
ताज्या बातम्या

चांदोली धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर... गतवर्षीच्या तुलनेत 237 मिलिमीटर पाऊस कमी

Published by : shweta walge

संजय देसाई|सांगली : चांदोली धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची हजेरी आहे. दररोज तीन ते चार हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरण 90.68 टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ तीन टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे धरण 100 टक्के भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

चांदोली परिसरात आज अखेर 2242 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. गतवर्षी याच तारखे अखेर 20 ऑगस्ट 2479 मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 237 मिलिमीटर पाऊस कमी आहे.. पाऊस कमी असला तरी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सारखाच आहे.. गतवर्षी आजच्या तारखेला धरण 90.97 टक्के भरले होते यंदा हीच टक्केवारी 90.68 टक्के आहे.

यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली पाच जुलै रोजी 85 मिलिमीटर पाऊस होऊन यंदाच्या पावसात पहिली अतिवृष्टी नोंदवली गेली. तिथून पुढे सलग आठ-दहा दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. पुन्हा 18 जुलैपासून पावसाने उघडीप दिली ती तब्बल सात ऑगस्टपर्यंत 21 दिवस पाऊस उघडला होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणाची पाणी पातळी सांडवा पातळीपर्यंत येऊन थांबली होती. त्यामुळे धरणाचे दरवाजे यंदा उघडणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आठ ऑगस्ट पासून पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली सलग सह दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी धरणाचे चारही दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. 10 ऑगस्ट रोजी तब्बल 138 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली. यंदाच्या पावसातील ही सर्वाधिक नोंद आहे.

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...