ताज्या बातम्या

Central Railway: ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

माटुंगा स्टेशनजवळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे.

Published by : Dhanshree Shintre

माटुंगा स्टेशनजवळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने बिघाड झाल्याचं दिसत आहे. माटुंगा स्टेशनजवळ अनेक गाड्या खोळंबल्या असून जलद मार्गावरील लोकल रखडल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक 25-30 मिनिटं उशिराने असल्याचं पाहायला मिळत आहे.

बुधवारी सकाळीच पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. याचा जबरदस्त फटका प्रवाशांना बसला आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाच्या जवळ कन्ट्रक्शन साईटचे बांबू ओव्हरहेड वायर वर पडल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा वारंवार कोलमडली आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी