ताज्या बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रांचा राज्यांना अलर्ट; नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये घ्या 'ही' खबरदारी

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सज्ज झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीत सर्व राज्यांना अलर्ट करण्यात आले असून कोरोना प्रतिबंधासाठीच्या तयारीबाबत चर्चा केली. यासंबंधी केंद्र सरकारने एक पत्रच जारी केले आहे.

बैठकीत मनसुख मांडविया यांनी आगामी सण आणि नवीन वर्षाचे उत्सव लक्षात घेऊन 'टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरण' वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. केंद्राने इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि तीव्र श्वसन आजाराच्या प्रकरणांचे नियमित जिल्हानिहाय निरीक्षण आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.

मनसुख मांडवियांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यांना कोविड नियमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात आरटी-पीसीआर आणि एंटीजेन चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाचे नवे व्हेरियंट वेळेत शोधली जाऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. रुग्णालयांमध्ये कोविडचा सामना करण्यासाठी संसाधने आणि कर्मचारी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय तयारी पाहण्यासाठी ड्राय रनही करता येईल, असे सांगितले आहे. लसीकरण वाढवण्यासाठी राज्यांना जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय बूस्टर डोसची व्याप्ती वाढवण्यासही सांगण्यात आले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती