Result Team Lokshahi
ताज्या बातम्या

CBSE Result: दहावीचा आज निकाल, असे मिळवा गुणपत्रक

CBSE Board Result : सीबीएसईच्या टर्म 1 आणि टर्म 2 च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना एकच संयुक्त गुणपत्रिका मिळणार आहे.

Published by : Team Lokshahi

CBSE Result: राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतर आता सीबीएसई विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. आज सीबीएसईचा दहावी निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई मंडळाकडून 24 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यानच्या काळात सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता सीबीएसईच्या टर्म 1 आणि टर्म 2 च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना एकच संयुक्त गुणपत्रिका मिळणार आहे.

दहावीच्या निकाल आज जाहीर होत असतांना बारावीचे निकालही लवकरच जाहीर होणार असल्याचं वृत्त आहे. दहावीच्या परीक्षेला 21 लाख विद्यार्थी बसले होते.

कसा पाहता येईल निकाल?

  • निकाल पाहण्यासाठी cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • होमपेजवर तुम्हाला दहावी, बारावीच्या टर्म 2 निकालांची लिंक दिसेल.

  • आपल्या इयत्तेला निवडा आणि लॉगईन करा.

  • आवश्यक ती माहिती भरा. त्यानंतर तुमच्यासमोर निकाल दिसेल, तो पाहा आणि त्याची प्रतही सोबत बाळगा.

बोर्डाने सूत्र बदलले

सीबीएसईने ठरवले होते की यावर्षी दोन्ही टर्मचा निकाल 50:50 मार्किंग स्कीमच्या आधारे लागेल. पहिल्या टर्मच्या परीक्षा होम सेंटरवर झाल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी नंबरमध्ये फेरबदल केल्याच्या तक्रारी आल्या. हे लक्षात घेऊन बोर्डाने होम सेंटरवर लागलेल्या निकालाचे प्रमाण 30:70 इतके कमी केले. या कारणांमुळे यंदा निकालाला विलंब झाला आहे.

या बेवसाईटवर तपासा निकाल

cbseresults.nic.in

results.gov.in

digilocker.gov.in

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी