अखिलेश यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. अवैध खाणप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. 2016पासून खाण गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. अखिलेश यांना आज दिल्लीत चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.
अखिलेश यादव यांच्याकडे खाण मंत्रीपदाची जबाबदारीही होती. त्यावेळी बंदी असतानाही खाणकामाचे कंत्राट देण्यात आले होते, असा आरोप आहे.