पुणे आणि मुंबईत सीबीआयने (cib raid)छापेमारी सुरु केली आहे. शाहीद बलवा आणि अविनाश भोंसले (shahid balwa and avinash bhosale)यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. एकूण 8 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. (cbi raids in pune and nagpur)
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी सुरु आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. डीएचएफएल व यस बँक घोटाळा प्रकरणी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. सीबीआय मुख्यालयातील टीम मुंबई युनिटसोबत बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती आहे. सोबतच शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यावर देखील छापे पडले असल्याची वृत्त आहे.
व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान या छापेमारीसंदर्भात बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हटले की, वाधवान ब्रदर्स यांनी जबरदस्त लुटलं आहे. बीकेसीत छाब्रिया यांचं ऑफिस आहे आणि बीकेसीतून जवळच बांद्रा इथे कुणाच्या खात्यात पैसे गेले याचीही चौकशी होणार आहे.
कोण आहे अविनाश भोसले
अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे आहे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते. पुढे अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरले. यासोबत ते छोटछोटी बांधकाम कंत्राटं घेत होते. अविनाश भोसले यांनी 1979मध्ये ABILग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. भोसले यांना शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये (1995) कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामं मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली. त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. या सरकारचं मुख्यालय पुणे असल्यानं ते अविनाश भोसले यांच्यासाठी अनेक अर्थांनी सोयीचं ठरलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात काम सुरू केलं, असं एका राजकीय पत्रकारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.पुढे जलसंपदा विभागातील प्रकल्पांबाबत वाद निर्माण झाला, तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली.गेल्या 15 ते 18 वर्षांत अविनाश भोसले यांची जी वाढ झालीय, ती प्रचंड वेगानं झालीय. जिला 'रॉकेट राईज' असं म्हटलं जाऊ शकतं, असं अविनाश भोसले यांचा प्रवास जवळून पाहिलेले जाणकार सांगतात.