अमझद खान | कल्याण : सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट अशा दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याचे आणि भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना डोंबिवलीतील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी अपशब्द वापरल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शिंदे गटाकडून ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत मंगळवारी दुपारी ठाकरे गट व शिंदे गटात जोरदार राडा झाला. शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढण्यात आला होता. काल दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटातील कार्यकर्ते शाखेत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फोटो लावण्यात आला. फोटो लावताना दोन्ही गटात जोरदार राडा झाला .दोन्ही गटातील कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी केली यावेळी एकमेकांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती .पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थीत नियंत्रणात आणली यामुळे शाखेला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.शिंदे गटातील योगेश जुईकर यांच्या तक्रारीनंतर राम नगर पोलीसानी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या विरोधात भा द वी १५३ अ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.