भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बुधवारी समोरा समोर उभे राहून राडा झाला. पुणे - बेंगलोर महामार्गावरच्या साताऱ्याच्या हद्दीतील उदयनराजें यांच्या जमिनीवरून हा वाद झाला. या राड्यावेळी दोन्ही बाजूने आपापल्या राज्यांच्या नावाच्या घोषणा समर्थकांच्या सुरु होत्या. पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.
शिवेंद्रराजेंना त्या ठिकाणी भूमीपूजनाचा नारळ फोडायचा होता आणि कुदळ मारायची होती. तर उदयनराजेंना ते रोखायचे होते. साताऱ्यातील प्रस्तावित नव्या बाजार समितीच्या भूमिपूजनावरून बुधवारी साताऱ्यात जोरदार राडा झाला होता. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजेंसह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी तक्रार केली आहे. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये बैठक सुरू आहे.