Buldana Depot killed in accident near Surat 
ताज्या बातम्या

मेकॅनिक शोधायला निघालेल्या बस कंडक्टरला कारने उडवलं, तडफडून मृत्यू

बसवर ड्युटीवर गेलेल्या वाहकाचा सूरत जवळच्या व्यारानजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडला असल्याचं समोर आलं आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

संदीप शुक्ला | बुलडाणा : सुरत या बसवर ड्युटीवर गेलेल्या वाहकाचा सूरत जवळच्या व्यारा नजीक अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (15 मे ) घडली. तर बुलडाणा डेपोमध्ये नादुरुस्त गाड्या रस्त्यावर बिनधास्तपणे सोडण्यात येत असून हा वाहक "ब्रेक डाऊन"चा बळी ठरल्याची जोरदार चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, बुलडाणा डेपोची MH 40 N 9588 क्रमांकाची बस सोमवारी सकाळी 9 वाजता सुरत साठी रवाना झाली. या बसवर श्याम कराळे रा. बुलडाणा चालक तर प्रमोद माळोदे रा.अफजलपूर वाडी वाहक म्हणून कार्यरत होते. सदर बस गुजरातच्या सीमेत दाखल होऊन व्यारा जवळ पोहोचली असता रात्री बस मध्ये काही तांत्रिक बिघाड आला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला एक गॅरेज होता, मेकॅनिकला बोलावण्यासाठी चालक व वाहक दोघे रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने वाहक प्रमोद माळोदे याला जोरदार धडक दिली. गंभीर अवस्थेत त्याला व्यारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्यारा पोलीस ठाण्यात स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेपोत मेंटेनन्सची कामे होत नाही

मागील काही काळापासून बुलडाणा डेपो आपल्या भोंगळ कारभारामुळे चर्चेत आहे. येथील अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बसेसच्या मेंटेनन्सकडे लक्ष दिले जात नाही. थातूरमातूर काम करून नादुरुस्त बसेस बिनधास्तपणे रस्त्यावर सोडल्या जात आहे. त्यामुळेच अनेक बसेस ब्रेक डाऊन होतात आणि याचा फटका नाहक प्रवाशांना बसतो. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे प्रवाशांसह एसटी वाहक व चालकांनाही आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...