जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यातील मराठा मोर्चाच्या नेत्यांची झूमद्वारे बैठक पार पडणार आहे. बैठकीनंतर उद्या महाराष्ट्र बंदची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी दिली आहे.