Uday Samant Lokshahi
ताज्या बातम्या

महाराष्ट्रात होणार कोट्यावधींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, "२३ हजार लोकांना रोजगार..."

महाराष्ट्रात अनेकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असतानाच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Published by : Naresh Shende

Uday Samant Press Conference : महाराष्ट्रात अनेकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असतानाच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी आणि राज्य सरकारसाठीही कालची कॅबिनेट सब कमिटी महत्त्वाची होती. कालची गुंतवणूक आपण एकत्रितपणे पाहिली तर, ८१ हजार १६७ कोटी रुपये आहेत. कोकाकोला हा पूर्वीचा प्रकल्प असल्याने १५०० कोटी रुपये आपण वजा केले, तर ८० हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट सब कमिटीत झाला. त्यातून २३ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असं मोठं विधान उदय सामंत यांनी केलं आहे.

पत्रकार परिषदेत उदय सामंत काय म्हणाले?

कालचा दिवस आणि आजचा दिवस महाराष्ट्राच्या औद्योगिक जगतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. युवकांना रोजगार देणारा आनंददायी होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, मागील तीन वर्षापूर्वी कॅबिनेट्स ऑफ सब कमिटी १५-१८ महिने होत नव्हती. त्यामुळे उद्योजकांना आत्मविश्वास नव्हता की, आम्हाला किती प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे? किती सबसीडी मिळणार आहे? शासन आपल्यासोबत आहे की नाही? असे प्रश्न कायमस्वरुपी उद्योजकांना पडायचे.

महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी आणि राज्य सरकारसाठीही कालची कॅबिनेट सब कमिटी महत्त्वाची होती. कालच्या कॅबिनेट सब कमिटीत अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १३ हजार ६४७ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही इन्सेटिव्ह पॅकेजचा विषय आम्ही निकालात काढला आहे.

त्यामुळे जवळपास ८ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. रत्नागिरीत कोकाकोलाचा प्रकल्प सुरु आहे, त्याला काही बेनेफिट्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. जे एस डब्लू एनर्जी २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. याच्यातून ५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. त्यांचाच इलेक्ट्रिकल वाहनांचा जो प्रकल्प आहे, जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलीटी याची गुंतवणूक २७ हजार २०० कोटी रुपये आहे.

यातून ५ हजार २०० रोजगाराची निर्मिती होणार आहे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स हा १२ हजार ३२ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. याच्यातून ४ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. पर्नाड रिकार्ड इंडियाकडून १७८५ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्याठिकाणी ८०० रोजगार निर्माण होणार आहेत. कालची गुंतवणूक आपण एकत्रितपणे पाहिली तर, ८१ हजार १६७ कोटी रुपये आहेत. कोकाकोला हा पूर्वीचा प्रकल्प असल्याने १५०० कोटी रुपये आपण वजा केले, तर ८० हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट सब कमिटीत झाला. त्यातून २३ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी