वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर वाढतच चालले आहेत. सोन्याचा दर प्रतितोळा लाखावर जाण्याची शक्यता आहे. वर्ष अखेरीस सोने 1 लाखावर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चांदीही प्रतिकलो लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
सध्या सोन्याचा दर 73 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत सोनं एक लाखाच्या घरात जाऊ शकतं, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान वाढता वापर पाहता चांदीचे दरही लाख रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंब सोन्यात गुंतवणूक करत असतात. त्यांना याचा फायदा होईल. मात्र ज्यांना आगामी काही महिन्यात लग्नसराईसाठी किंवा हौसेखातर सोनं खरेदी करायचं असेल त्यांचा मात्र दर पाहून हिरमोड होण्याची शक्यता आहे.
जानेवारी 2024 मध्ये सोन्याचे दर 64 हजार होते. ते सहा महिन्यात म्हणजे जून 2024 पर्यंत 72 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. तर चांदीचेही 78,600 प्रती किलोचे दर 11 ते 12 हजार रुपयांनी वाढून 90 हजार रुपये झाले आहेत.