ताज्या बातम्या

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात

एक भीषण अपघात समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजाजवळ लोकेशन क्रमांक 173 वर झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. असाच एक भीषण अपघात समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजाजवळ लोकेशन क्रमांक 173 वर झाला आहे. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसने ट्रकला जोरदार धडक दिली आहे.

हा अपघात 1 फेब्रुवारीच्या रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. समृद्धी महार्गावर प्रवास करताना अचानक नीलगाय रस्त्यावर आडवी आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना असलेला महामार्ग असल्याचा कितीही दावा केला तरी, त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

पुजा ट्रॅव्हल नामक एक खाजगी बस 1 फेब्रुवारीच्या रात्री नागपूरवरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान मध्यरात्री ही बस समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ लोकेशन क्रमांक 173 जवळ आली असतांना बसच्या सामोर असलेल्या एका ट्रकपुढे अचानक निलगाय आली. ट्रकचाकाने या नीलगायला वाचविण्यासाठी जोरदार ब्रेक मारून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला आणि ट्रक नियंत्रणात आणला.

सुदैवाने यात त्या नीलगायचा जीव वाचला. मात्र अचानक ट्रकने ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या बसला अंदाज न आल्याने बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. भरधाव बसने ट्रकला धडक मारल्याने बसमधल्या 16 ते 17 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर्व जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

या पूर्वी देखील या मार्गावर अनेक अपघात झाले आहे. दोन बसची धडक झाल्याने तब्बल 17 प्रवाशांच्या जळून मृत्यू झाला होता. दरम्यान, या मार्गावर वाढत्या अपघातामुळे या मार्गाची पाहणी करून सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या.

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू