ताज्या बातम्या

Budget 2024 LIVE : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही – निर्मला सीतारमण

Published by : Siddhi Naringrekar

Budget 2024 Live : 10 वर्षांत आयकर संकलन 3 पटीने वाढले - निर्मला सीतारमण

10 वर्षांत आयकर संकलन 3 पटीने वाढले. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे.

Budget 2024 Live :  जुलै महिन्यात आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल - निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण पूर्ण केलं आहे. जुलै महिन्यात आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

Budget 2024 Live : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाच बदल नाही. इन्कम टॅक्स गेल्यावर्षीप्रमाणेच राहणार आहे.

Budget 2024 Live : वार्षिक 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही भरावा लागणार 

वार्षिक 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कर नाही भरावा लागणार.

Budget 2024 Live : 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रुपांतरित केले जाणार आहे

तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारण्यात येणार आहे. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे.

Budget 2024 Live :  विमानतळांच्या संख्येत वाढ होणार

517 नवीन विमान मार्ग प्रस्तावित केले आहेत.

Budget 2024 Live : पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची असतील – निर्मला सीतारमण

Budget 2024 Live : 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत – निर्मला सीतारमण

Budget 2024 Live : गेल्या 10 वर्षात सरकारने 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून मुक्त करण्यासाठी मदत केली – निर्मला सीतारमण

Budget 2024 Live : आमचे गरीब, महिला, तरुण व शेतकरी/अन्नदात्यावर लक्ष – निर्मला सीतारमण

आपण गरीब, महिला, तरुण व शेतकरी/अन्नदात्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे; त्यांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Budget 2024 Live :  महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर – निर्मला सीतारमण

महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर . गेल्या 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत.

Budget 2024 Live :  युवांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

Budget 2024 Live :  2047 पर्यंत भारत विकसित देश असेल - निर्मला सीतारमण

आमचे सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेने काम करत आहे, त्यात सर्व जाती आणि स्तरातील लोकांचा समावेश होतो.

Narendra Modi : अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल

अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Nirmala Sitharaman Speech : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली

Budget 2024 Live : अंतरिम बजेटला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

अंतरिम बजेट २०२४ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. 

Budget 2024 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत दाखल

Budget 2024 Live : अर्थसंकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची बैठक सुरू

अर्थसंकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे.

Budget 2024 Live : अर्थसंकल्पाच्या प्रती पोहोचल्या संसद भवनात

अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात पोहोचल्या आहेत. 

Budget 2024 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण  संसदेत दाखल

अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत दाखल. थोड्याच वेळात बजेट सादर होणार

Budget 2024 Live : बजेट तयार करणाऱ्या टीमचे फोटो सेशन पार पडले

बजेट तयार करणाऱ्या टीमचे फोटो सेशन पार पडले. 

Budget 2024 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात पोहोचल्या 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत.

LPG Cylinder : बजेट सादर होण्याआधीच महागाईचा भडका; एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ; दर काय?

आज 1 फेब्रुवारी 2024 पासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईत व्यावसायिक सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे. याच्याआधी 1708 रुपयांना मिळत होता. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.

Budget 2024 Live : आज अर्थसंकल्प सादर होणार; मोदी सरकार सर्वसामान्यांना काय गिफ्ट देणार?

आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमणआज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा