केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने नवीन योजना आखली आहे. यासोबतच आत्मनिर्भर भारत योजनेचाही मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात येणार आहे.
८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार आहे. २८ महिने ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येणार आहे. . दोन वर्षासाठी या योजनांचा लाभ घेता येईल. याचा कालावधी मार्च २०२५ मध्ये पूर्ण होईल. याचा अर्थ असा की, मार्च २०२५ पर्यंत महिला २ लाख रुपयांपर्यंतचे सन्मान पत्र खरेदी करू शकतात. यावर ७.५ टक्के इतके व्याज वर्षाला दिले जाईल. दोन वर्षाच्या काळात गरज लागली तर यातील थोडी रक्कम काढून घेता येईल. असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.