ताज्या बातम्या

कोरोनापेक्षाही भयंकर! शास्त्रज्ञांचा दाव्याने चिंता वाढली, 5 कोटी जणांचा...

कोरोनाच्या महामारीने जगभरात कहर माजवला. या महामारीमुळे जगभरात सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोविडची लस उपलब्ध झाली आणि याचा प्रसार आटोक्यात आला. दरम्यान,

Published by : shweta walge

कोरोनाच्या महामारीने जगभरात कहर माजवला. या महामारीमुळे जगभरात सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोविडची लस उपलब्ध झाली आणि याचा प्रसार आटोक्यात आला. दरम्यान, भविष्यातही महामारी संकट घोंघावत असल्याचा दावा जगभरातील शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. भविष्यात कोरोनापेक्षाही भयंकर महामारीमुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू होण्याची भीती असल्याचा दावा जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.

ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी मोठा दावा केला आहे की, येत्या काळात आणखी एका भयंकर महामारीचं संकट आपल्या समोर येणार आहे. यूकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, डिसीज एक्स ही महामारी कोरोनापेक्षाही भयंकर ठरू शकते. इतकंच नाही तर, या नवीन विषाणूचा प्रकोप 1918-1920 च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा प्रभाव असू शकतो, असा दावाही या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. युके वॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष डेम केंट बिंघम यांनी धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, डिसीज एक्स महामारी कोरोना पेक्षा सात पटीने धोकादायक ठरू शकतो.

यूकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, येत्या काळात आणखी एक महामारी आपल्यासमोर येणार आहे, ज्याला डिसीज एक्स असे नाव देण्यात आले आहे. तज्ञांनी चेतावणी दिली आहे की या नवीन विषाणूचा 1918-1920 च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा प्रभाव असू शकतो. जो कोविडपेक्षा प्राणघातक, 5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शास्त्रज्ञांच्या पथकाचं मूळ उद्दीष्ट अशा विषाणूवर आहे, जे प्राण्यामधील विषाणू असून भविष्यात हे विषाणू मानवाला संक्रमित करण्याची शक्यता आहे आणि यामुळे भविष्यात जगभरात नवी महामारी पसरण्याचीही भीती आहे. यामध्ये बर्ड फ्लू, मंकीपॉक्स आणि हंता व्हायरसच्या विषाणूंचा समावेश आहे. दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (यूकेएचएस) प्रमुख प्रोफेसर डेम जेनी हॅरी यांनी सांगितलं की, हवामान बदल आणि लोकसंख्येतील बदल यासारख्या घटकांमुळे भविष्यात साथीच्या रोगांची शक्यता वाढत आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news