इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नुकताच झालेले भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. मात्र, याच भेटीनंतर ब्रिटन सरकारने भारतीय नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. भारतीयांसाठी दरवर्षी ३००० व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे.
ब्रिटन सरकारने या योजनेचा फायदा मिळणारा भारत पहिला देश असल्याचे यावेळी सांगितले आहे. यामुळे ब्रिटनमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी यामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी १८ ते ३० वयोगटातील ३००० प्रशिक्षित तरुण दोन वर्षांसाठी ब्रिटनमध्ये वास्तव्य आणि नोकरी करु शकतात.
या योजनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास ब्रिटन सरकारने व्यक्त केला आहे. तसंच दोन्ही देशांची अर्थव्यवस्था अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचं दर्शवत असल्याचंही सांगितलं आहे.