Monsoon Updates Live 
ताज्या बातम्या

🔴Red Alert : मुंबईकरांनो सावधान; अतिमुसळधार पावसाची शक्यता

Monsoon Updates | Rain Updates Live : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी तर दुसरीकडे मुसळधार पाऊस आहे. हवामान खात्याकडून राज्यभर तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशात मुंबईसह प्रत्येक जिल्ह्याचे संपूर्ण अपडेट्स, राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर...

Sudhir Kakde

मुंबईकरांनो सावधान; 200 मी. मी. पावसाची शक्यता

मुंबईत आज बर्‍याच ठिकाणी 140 ते 150 मिमी दरम्यान पाऊस झाला असून, हा पाऊस अतिमुसळधार पावसाच्या श्रेणीमध्ये येतो. त्यामुळे खबरदारी घेणं अत्यंत गरजेतचं आहे असं हवामान विभागाचे अधिकारी होसळीकर यांनी सांगितलं आहे. मुंबईला अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा (200 मिमी पेक्षा जास्त) देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितला.

मुंबई, रत्नागिरीत मुसळधार पावसानं कोसळल्या दरडी

मुंबई अपडेट्स : मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात मुसळधार पावसामुळे, घाटकोपर, मुंबईच्या उपनगरीय भागांत तसंच, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये किमान दोन ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, घाटोकपरच्या पंचशील नगरमध्ये आज सकाळी भूस्खलन झाल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचं अग्निशमन विभागाने सांगितलं आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे घराचं नुकसान झालेलं दिसतंय. घराची भिंत कोसळल्यानंतर रहिवासी ढिगाऱ्याखाली घरातील साहित्याचा शोध घेताना दिसत आहेत.

कोयना धरणं पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढला, कोयनेत 74 मिलिमीटर पाऊसाची नोंद

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष यंदा कोयना धरणाकडे लागलेले असताना पावसाने जून महिना ओलांडला तरी देखील पावसाने उघडीकता घेतल्यामुळे सर्वांच्या चिंता वाढत होत्या अशात पाच दिवसापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती सिंचनाचा प्रश्न तसेच वीज निर्मितीचा प्रश्न यासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत. कोयना धरणात 2 टीएमसी ने पाणी साठ्यात वाढ झालेली असून गेल्या चोविस तासात महाबळेश्वरमध्ये 129 मिलिमीटर पाऊसाची नोंद तर नवजामध्ये 118 मिलिमीटर तर कोयनेत 74 मिलिमीटर पाऊसाची नोंद झालेली आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद 14 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक वाढली आहे.

मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत 

सोमवार रात्रीपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही तासांपासून कोसळत असलेल्या पावसांमुळे मुंबईतील विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर, लोकल रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

नवीमुंबईच्या खांदेश्वर स्टेशन मध्ये पाणी साचले आहे 

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पनवेलच्या खांदेश्वर स्टेशन परिसरात पाणी तुंबले आहे. मुंबईतील अंधेरी, सायन, चेंबूर आणि कुर्ला येथील काही भागात जोरदार पाणी साचल आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत मुसळधार,  पावसामुळं अनेक सखल भाग पाण्याखाली

मंगळवारी सकाळपासून मुंबईतील अनेक भागात अधूनमधून पाऊस पडत आहे, त्यामुळे पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे चित्र मुंबईतील वांद्रे सायन टी जंक्शनजवळचे आहे, जिथे मुसळधार पावसानंतर पाणी साचले आहे,

Latest Marathi News Updates live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देणार-सूत्र

Eknath Shinde Resign | मोठी बातमी, एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | Lokshahi

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi