Devendra Fadanvis  Team Lokshahi
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांसाठी ब्राम्हण महासंघाची शिष्टाई

भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरींना वगळलंय...दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या निवडणूक समितीत स्थान दिलंय...

Published by : Team Lokshahi

भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरींना वगळलंय...दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या निवडणूक समितीत स्थान दिलंय...यामुळे फडणवीसांची वाटचाल राष्ट्रीय राजकारणाकडे सुरु झाल्याची चर्चा होतेय... फडणवीसांसाठी आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सरसावलाय... महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना पत्र लिहून फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केलीय... एवढंच नाही तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी महासंघाची असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय...

पुण्यातून काही जणांना पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खासदार केल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय... 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 मध्ये अनिल शिरोळे तर 2019 मध्ये गिरीष बापट यांच्या विजयात ब्राह्मण महासंघाचा वाटा होता...

दरम्यान ब्राह्मण महासंघाच्या मागणीला पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी विरोध दर्शवला. अशा प्रकारमुळे जातीवादाला खतपाणी घातले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय...

संघ आणि भारतीय जनता पक्षाकडून पुढील अनेक वर्षांचा विचार केला जातो. नरेंद्र मोदी यांना गुजरातमधून राष्ट्रीय राजकारणात आणण्यापूर्वी त्यांच्या गुजरात पॅटर्नचा जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आला होता...त्यानंतर 2014 मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते... तोच विचार ब्राह्मण महासंघ देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत करताना दिसत आहे...परंतु संघाच्या मनात काय आहे? हे अजून कोणीच ओळखू शकले नाही...

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news