ताज्या बातम्या

खळबळजनक! पुण्यातील दहशतवादीच्या सिलींग फॅनमध्ये बॉम्ब बनवण्याच्या तयारीचं कागद

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Published by : shweta walge

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोघेही राहत असलेल्या पुण्यातील कोंडवा येथील घरात सिलींग फॅनमध्ये बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेला कागद लपवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर अॅल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंट्समध्ये बंदुकीच्या दोन गोळ्या सापडल्या असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितल आहे.

पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी वय -24, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा- मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे. तर मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) हा फरार झाला आहे. त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा एटीएसच्या पथकाकडून शोध सुरु आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपी हे एन.आय.ए (NIA) कडील गुन्ह्यात फरार असल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपींवर प्रत्यकी पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस महासंचालक (DGP) यांनी दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केला आहे. यानंतर एटीएसने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय