ताज्या बातम्या

Bomb Blast In Mumbai Threat : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन

मुंबई व पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या धमकीच्या फोनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई व पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या धमकीच्या फोनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले की, कॉलरने काल सकाळी 10 वाजता पोलिस कंट्रोलला कॉल केला आणि दावा केला की, 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार आहेत.

एवढेच नाही तर कॉलरने पुढे दावा केला की आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉलरने केला आहे.

पोलिस तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी