आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व उपनगर भागात महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या त्रुटी मतदान व मतदान मोजणीच्या दिवशी नागरिकांना भासल्या त्या सर्व चुका बारकाईने लक्षात घेत विधानसभेच्या दृष्टिकोनातून घडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नागरिकांना मोबाईल न घेऊन येण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मतदान केंद्रावर रांगा लागणार नाहीत, बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था तसेच पंखे, शेडचे व्यवस्था अशा अनेक सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 36 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी 10 विधानसभा मतदारसंघ हे मुंबई शहर जिल्ह्यात आणि 26 विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून एकंदर निवडणूक कामाचा आढावा घेतल्यानंतर मतदान केंद्राचे विकेंद्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात आले आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे देखील यावेळी गगराणी म्हणाले आहेत.