sexual abuse team lokshahi
ताज्या बातम्या

वर्ध्यात काळिमा फासणारी घटना; भावानं केलं बहिणीच शोषण, पीडित 6 महिन्याची गर्भवती

विकृत घटनेने शहरात खळबळ, अल्पवयीन भाऊ पोलिसांच्या ताब्यात

Published by : Shubham Tate

वर्धा (भूपेश बारंगे) :- वर्ध्यात मागील काही दिवसांपासून समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत घटना घडताना दिसत आहेत. मोबाईल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम युवकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशातच वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडलीय. वर्धा शहरात सख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची खळबळजनक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले असता पीडिता ६ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. (Black incident in Wardhya; Brother abused sister, victim 6 months pregnant)

भारतीय संस्कृतीत काही नाती खूप पवित्र मानली जातात. त्यामध्ये आई-मुलगा व बहीण भावाचे नाते सामील आहे. मात्र, वर्धा शहरात मानवतेला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे. सख्या भावाने बहिणीवर अत्याचार करण्याची लाजीरवाणी घटना घडली. १५ वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम १७ वर्षीय भावाने बहिनीचे शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्याने घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने याबत माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करत होती. पीडित माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपवण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तीला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पानावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचे माहिती घेतल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सख्या बहिनीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलिसांनी विकृत असलेल्या १७ वर्षीय भावाला ताब्यात घेतले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय