ताज्या बातम्या

छत्तीसगडमध्ये भाजपाचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच आमदार झालेल्या नेत्याची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती!

छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपाने मोठ्या बहुमताने जिंकली. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आपली तयारी सुरू केली असून छत्तीसगडमध्ये या

Published by : shweta walge

छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपाने मोठ्या बहुमताने जिंकली. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आपली तयारी सुरू केली असून छत्तीसगडमध्ये या पक्षाने महत्त्वाचा बदल केला आहे. भाजपाने छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी पहिल्यांदाच आमदार झालेल्या किरणसिंह देव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. देव यांनी अरूण साओ यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

देव बस्तर जिल्ह्यातील दुसरे प्रदेशाध्यक्ष

किरणसिंह देव हे बस्तर जिल्ह्यातील जगदलपूरचे मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून देव यांचे या प्रदेशात राजकीय प्रस्थ वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने देव यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. २०१८ साली काँग्रेसने या प्रदेशातील १२ पैकी ११ जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर नंतर पोटनीवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीही येथे काँग्रेसनेच बाजी मारली होती. मात्र आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकूण १२ पैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे. देव हे बस्तर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत, ज्यांची भाजपाने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. याआधी २०१९ ते २०२० या काळात छत्तीसगड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बस्तर जिल्ह्यातीलच विक्रम उसेंडी यांच्यावर सोपवण्यात आली होती.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट