भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह कार्यालयाच्या आत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पृथ्वीराज नासक असं या हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव असून रक्ताने माखलेल्या अवस्थेत कार्यालयात सापडला. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेले अटक केली आहे. भाजपाने या प्रकरणामागे तृणमूलचा हात आहे असा आरोप केला आहे.
मृतदेह भाजपा कार्यालयाच्या आत सापडल्याची ही घटना पश्चिम बंगाल येथील २४ परगणा जिल्ह्याती उस्थी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली असून तिने हे मान्य केलं आहे की धारदार शस्त्रांनी तिने या कार्यकर्त्यावर वार केले. या प्रकरणात या महिलेने ही कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
शुक्रवारी रात्री पक्ष कार्यालयात नसकर यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. तो ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. जिल्ह्यातील भाजपाची सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्याचं काम पृथ्वीराजकडे होतं.