चिंचवड मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड पोटनिवडणूक जाहीर केली आहे.भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन जानेवारी रोजी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. चिंचवड मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा आरोप केला आहे. शेळके म्हणाले की, भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे मृत्यूशी झुंज देत होते. तेव्हा, तीन महिन्यापासून भाजपा चिंचवड पोटनिवडणूकीची तयारी करत होती.असा आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी ची पिंपळे गुरव या ठिकाणी बैठक पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पंढरपूर येथे पोटनिवडणूक लागली तेव्हा भाजपाने सहानुभूती चा विचार केला नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेवट चे क्षण मोजत होते. तेव्हा, भाजपाने तीन महिन्यापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची तयार सुरू केली. अशा ठिकाणी सहानुभूती चा विचार करावा का? असा सवाल त्यांनी विचारला