Eknath Shinde  Team Lokshahi
ताज्या बातम्या

‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; भाजपाचा हा पदाधिकारी फडणवीस आणि अमित शाहांना लिहिणार पत्र

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राजकीय वातावरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. राजकीय वातावरण कुठेतरी तापलेले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एकनाथ शिंदे (eknath shinde ) मुख्यमंत्री झाल्यापासून राजकीय वातावरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. राजकीय वातावरण कुठेतरी तापलेले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल (Ashish Jaiswal) हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत १५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी भाजपाच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉ. राजेश ठाकरे ( Dr. Rajesh Thackeray ) यांनी केली.

यासोबतच ते म्हणाले की, “आ. जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार व खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सत्तेचा दुरुपयोग केला. खिंडसी ते वैनगंगा-सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरासाठी मातीमिश्रीत वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून वाळू तस्करी केली. यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालांवर ३०० कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरवातही झाली होती. परंतु, तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केल्याचा आरोपही,” त्यांनी केला आहे.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस (shinde - fadnavis ) सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे”. असे त्यांनी एका पत्रकार परिषदमध्ये सांगितले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय