आगामी महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईत २८ टक्के मराठी मतदार आहेत, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भाजप मुंबईत १३८ जागांवर मराठी चेहऱ्याना संधी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नुकतेच मुंबई पालिकेसाठी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार मुंबईतील २२७ पैकी १११ जागांवर भाजप, शिंदे गट, अजित पवार गट व त्यांच्या मित्र पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट व काँग्रेस, शरद पवार गट यांचे शंभर जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा निकाल हा एक सप्टेंबरनंतर लागणार असे गृहीत धरून पालिका निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे समजते. त्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.