Girish Mahajan Google
ताज्या बातम्या

Girish Mahajan: "अनिल देशमुखांनी पोलीस अधीक्षकांवर दबाव आणला आणि..."; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे मोक्का कोर्टात धक्कादायक अहवाल सादर केल्याचं समोर आलं आहे. या अहवालामुळं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

Published by : Naresh Shende

Girish Mahajan On Anil Deshmukh: केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे मोक्का कोर्टात धक्कादायक अहवाल सादर केल्याचं समोर आलं आहे. या अहवालामुळं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिली होती. विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणात धमकीचा आरोप होता,असा धक्कादायक अहवाल सीबीआयने पुणे मोक्का कोर्टात सादर केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखांवर हल्लाबोल केला आहे.

गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिलेला जबाब ही वस्तुस्थिती आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन वर्ष बारा दिवसांनी मी फोनवर कोणाला धमकी दिली, याविषयी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर दबाव आणला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अनिल देशमुख यांच्याशी मी बोललो होतो. त्या केसमध्ये मोक्का लागू होता, म्हणून मलाही त्या केसमध्ये टाकून मोक्का लावायचा, असा त्यामागचा हेतू होता.

यातील मास्टर माईंड तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचं देवेंद्र फडणवीस यांनी जे रेकॉर्डिंग विधानसभेत सादर केले होते, त्यात याबाबतचा उल्लेख करण्यात आला होता. खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी क्रिमिनल माईंड लागतं, हे सर्व प्रवीण चव्हाण यांनी त्या रेकॉर्डिंग मध्ये कबूल केलं आहे. या कामात अनिल देशमुख यांनी कशी मदत केली, याचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. या संदर्भात सीबीआयकडून चौकशी झालेली आहे. सीबीआयने याबाबत स्पष्टपणे चौकशी करून त्यात जे खरं आहे, तेच तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितलं आहे.

गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक जेलमध्ये टाका, गिरीश महाजन संपले म्हणजे देवेंद्र फडणवीस संपणार, हा या मागचा हेतू होता. या गुन्ह्यात गिरीश महाजन फसत नसतील, तर मुंबई-पुणेला जाताना चौकशीच्या नावाखाली त्यांच्या गाड्या तपासा. गाड्या तपासताना गाड्यांमध्ये चरस, गांजा, हिरोईन यासारखे आमली पदार्थ टाकून त्यात त्यांना अटक करा, असं स्पष्टपणे वकील प्रवीण चव्हाण यांच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण व पोलीस अधिकारी यांचं संभाषण त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे. माझ्याविरुद्ध प्लॅनिंग करत होते, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. गिरीश महाजनांवर कशाप्रकारे मोक्का लागला पाहिजे, असं त्या आरोपपत्रात स्पष्ट सांगण्यात आलं आहे. गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत. यासाठी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. हे गुन्हे दाखल करायला लावले. यांसंदर्भातले ऑडिओ, व्हिडीओ पुरावे मी स्वत: दिले होते. त्यावर सीबीआयकडे केस दाखल झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहीत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती, हे आपण सर्वांनी नीट पाहिलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे